सभासदत्व नियम

मराठी भाषा आणि संस्कृती बद्दल आदर आणि आपलेपणा ठेवणारा तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या नियमांचे पालन करणारा कुठलाही मराठी भाषी व्यक्ती किंवा मराठी भाषिक व्यक्तींकरिता स्थापित संस्था बृहन्महाराष्ट्र मंडळ चे सभासदत्व घेऊ शकतात . सभासदत्व हे दोन प्रकारचे आहे:

बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली

बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली ही संस्था रजिस्ट्रार, फर्म्स एंड सोसायटीज, नवी दिल्ली येथे रजिस्टर्ड असून संस्थेचा रजिस्टर्ड क्र.1308/1958-59 दि.29.09.1958 असा आहे. संस्थेचे रजिस्टर्ड कार्यालय नवी दिल्ली येथे 10056, गल्ली नं.2, मुलतानी ढांडा, पहाडगंज पोलीस स्टेशनसमोर, पहाडगंज, नवी दिल्ली 110055 येथे आहे.

 1. संस्थागत सभासदत्व: बृहन्महाराष्ट्र मंडळ च्या उद्देश्यांना समर्पक असलेले उद्देश्य आणि आपल्या राज्यात सोसायटीरेजीस्ट्रेशन कायदा १९६० च्या अंतर्गत रजिस्टर्ड,बृहन्महाराष्ट्र मंडळ, (मध्यवर्ती संघटना, नवी दिल्ली) चे निर्धारित शुल्कभरणा-याबृहन्महाराष्ट्रातमुख्यालय(अर्थात महाराष्ट्र बाहेर कायम स्वरूपी मुख्यालय) असलेल्यासंस्था ह्यांना संस्थागत सभासदत्व घेतायेईल.
  • सभासदत्व देणगी : रुपये २०००/- मात्र
  • सभासदत्व अवधि : पंधरा(१५) वर्षे


 2. वैयक्तिक सभासदत्व: बृहन्महाराष्ट्र मंडळ, (मध्यवर्ती संघटना, नवी दिल्ली)च्याउद्देश्यांशी सहमती असल्यासबृहन्महाराष्ट्र मंडळाचे निर्धारित शुल्कभरणा-या१८ वर्ष पेक्षा अधिक वय असलेल्या बृहन्महाराष्ट्रात स्थायिक (अर्थात महाराष्ट्र बाहेर कायम स्थायिक) असलेलेस्त्री/पुरुष ह्यांनावैयक्तिकसभासदत्व घेतायेईल. वैयक्तिक सभासदत्व दोन प्रकार चे असेल (१) संरक्षक सभासद , आणि(२) आजीव सभासद
  • संरक्षक सभासद देणगी : रुपये ५०००/- मात्र
  • आजीव सभासद देणगी : रुपये २०००/- मात्र
  • सभासदत्त्व अवधि : तहहयात


 3. टीप: कुठल्या ही प्रकार चे सभासदत्व बृहन्महाराष्ट्र मंडळ (मध्यवर्ती संघटना) नवी दिल्ली च्या नियम व घटने अंतर्गत राहील . कुठल्या ही विशेष परिस्थितीत नियमांप्रमाणे कार्यकारिणी ला सभासदत्व स्थगित किंवा रद्द करण्याचे समस्त अधिकार राहतील.
सभासदत्व अर्ज: वरील नमूद कुठल्याही प्रकारच्या सभासदत्वा करिता इच्छुकांनी ऑनलाइनअर्ज करण्या करिता खालील प्रमाणे पर्याय निवडावा अथवा आपल्या विभागीय कार्यवाह शी संपर्क करावा