बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीचा परिचय व कार्य

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्याचा विस्तार देशभरात व्हावा, संस्थेचीस्थापना, उद्देश्य व कार्याची माहिती सर्वांना व्हावी, तसेच मराठी भाषा, संस्कृती व परंपरेची जोपासना व्हावी असा आमचा मानस आहे. आमची संस्था अखिल भारतीय स्तरावर कार्य करीत असून संस्थेचे कार्य, उद्देश्य व प्रकल्प आपणांसमोर यावेत व संस्थेची माहिती आपल्यापुढे यावी यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाचा परिचय व कार्य थोडक्यात आपल्यासमोर प्रस्तुत आहे.

बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली

बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली ही संस्था रजिस्ट्रार, फर्म्स एंड सोसायटीज, नवी दिल्ली येथे रजिस्टर्ड असून संस्थेचा रजिस्टर्ड क्र.1308/1958-59 दि.29.09.1958 असा आहे. संस्थेचे रजिस्टर्ड कार्यालय नवी दिल्ली येथे 10056, गल्ली नं.2, मुलतानी ढांडा, पहाडगंज पोलीस स्टेशनसमोर, पहाडगंज, नवी दिल्ली 110055 येथे आहे.

संस्थेचा उद्देश व कार्य

मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचा प्रचार-प्रसार करणे, यासाठी बृहन्महाराष्ट्रातील विभिन्न मराठी संस्था व व्यक्तींना एकत्रित करण्यासाठी त्यांना सदस्यत्व देणे. अशा संस्थांना मार्गदर्शन करणे, मराठी भाषेच्या विभिन्न स्तरात परीक्षांचे व निबंध प्रतियोगितेचे आयोजन करणे, मराठी भाषेचे मुखपत्र प्रकाशित करुन विभिन्न संस्थाच्या गतिविधींची माहिती प्रकाशित करणे, बृहन्महाराष्ट्रातील विभिन्न प्रांतातील मराठी भाषिक संस्था व सदस्यांना एकत्रित आणण्यासाठी प्रांतीय अधिवेशन आयोजित करणे, वार्षिक अधिवेशनाच्या माध्यमाने संपूर्ण बृहन्महाराष्ट्रातील संस्थागत व आजीवन सदस्यांना एकत्रित करणे, मराठी संस्था व मराठी व्यक्त/उद्योजक यांचा सन्मान/सत्कार करणे.

बृहन्महाराष्ट्रातील एकुण संस्था:

उत्तर भारत – दिल्ली 23, हरियाणा 1, हिमाचल प्रदेश 2, पंजाब 2, उत्तर प्रदेश 20 उत्तरांचल – देहरादून 1, हरिद्वार 2, मध्यप्रदेश – भोपाळ/विदिशा 17, खंडवा/खरगोन 7, इंदूर/महू/धार 31, देवास/उज्जैन/रतलाम 16, बैतूल 1, होशंगाबाद/इटारसी/हरदा 5, शुजालपुर/राजगढ 5,सागर/बीना 5, ग्वाल्हेर/गुणा 21, जबलपुर 12, अन्य 69, छत्तीसगढ – 49; राजस्थान – 12 ; गुजरात - 100, दमण - -1, गोवा 20, आंध्रप्रदेश 30, केरळ 1 ; कर्नाटक – 40, तामिलनाडू – 16, बिहार – 6, ओडीशा – 4, पश्चिम बंगाल – 17; अंदमान निकोबार – 2 नाट्यसंस्था : मध्यप्रदेश – 24 ; गुजरात – 9 ; गोवा – 32 ; आंध्रप्रदेश 4 ; कर्नाटक – 4, छत्तीसगढ – 2 ; उत्तरप्रदेश – 2 ग्रंथालय – 15; नियतकालिके (मासिक/साप्ताहिक/त्रैमासिक/वार्षिक) – 71 ; धार्मिक स्थळे - 106; सहकारी संस्था - 45; गृहनिर्माण संस्था - 7; वधु-वर परिचयसंस्था : 30; शिक्षण संस्था - 122 अशाप्रकारे वरील सर्व संस्था बृहन्महाराष्ट्राशी जोडलेल्या असून त्यांच्या सदस्यांची एकुण संख्या जवळपास 5000 च्या वर आहे.