“वृहन माय मराठी” मिळत नाही

मुखपत्र “वृहन माय मराठी” मिळत नाही सर्व सभासदांना एतद्द्वारे कळविण्यात येत आहे कि संस्थेचे मुखपत्र “वृहन माय मराठी” मिळाले नाही अशी बऱ्याच सभासदांची खंत असते आणि वेळोवेळी ते कार्यकारिणीला तसं कळवत पण असतात. बऱ्याच वेळा असे आढळून येते कि सभासदांचा टपाल पत्ता हा चुकीचा असल्या मुले टपाल माध्यमांतून पाठविलेले मुखपत्र “वृहन माय मराठी” ची प्रत एकीकडे सभासदांना मिळत ही नाही आणी दुसरी कडे मंडळाला देखील आर्थिक भुर्दंड बसतो. अश्या सर्व पत्त्यांची यादीची लिंक अधिकृत संकेत स्थळाच्या मुखपृष्ठावर दिलेली आहे. तरी सर्व सभासद ज्यांना मुखपत्र “वृहन माय मराठी” टपाला द्वारे मिळत नाही त्यांनी ह्या यादीचे  निरीक्षण करावे व तदनंतर आपल्या बरोबर पत्ता मोबाईल क्रमांक 8989792200 वर व्हाटसप करावे किंवा yash.phatak@gmail.com वर ईमेल करावा ही विनंती. अश्या प्रकारे सूचना मिळाल्या वर मंडळाच्या रेकॉर्ड मध्ये पत्ता सुधारण्यात येईल.