"मराठी भाषा युवक मंडळे - सन २०२४"


"मराठी भाषा युवक मंडळे - सन २०२४"
मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर परंतु देशातंर्गत मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करणे व या उपक्रमांतर्गत, निश्चित केलेल्या विहित कार्यपद्धती व निकषांना अनुसरून मान्यताप्राप्त मराठी भाषा युवक मंडळांतून निवड झालेल्या प्रत्येक पात्र मंडळाला वार्षिक रु. १०,०००/- इतके अनुदान सहाय्य करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील तथा महाराष्ट्राबाहेरील परंतु देशांतर्गत मराठी भाषा युवक मंडळे नोंदणीकृत असावीत.
या उपक्रमांतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिनांक ०१/०३/२०२४ ते १५/०३/२०२४ या कालावधीत, खालील विहित नमुन्यातील गुगल अर्जाद्वारे (Google Form) अर्ज मागविण्यात येत आहेत
मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करणे याबाबतचा मराठी भाषा विभागामार्फंत दि. १३ जुलै २०२३ रोजी निर्गमित करण्यात आलेला शासननिर्णय https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202307131254482233.pdf या दुव्यावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या शासननिर्णयात नमूद केलेली व्याप्ती, अपेक्षित उपक्रम, अटी व शर्ती, अंमलबजावणीचे टप्पे व सर्वसाधारण नियमावली यांचे वाचन करून खालील गुगल अर्ज (Google) भरण्यात यावा.
सदर अर्ज मराठीत (देवनागरीत) भरणे बंधनकारक आहे.

गुगल अर्जाचा (Google Form) दुवा -  https://forms.gle/aUsgMPm4a9AbSBo3A