मराठी भाषा परीक्षा 2018 ह्या वर्षी 25 डिसेंबर 2018 रोजी होतील

* मराठी भाषा, संस्कृती, ज्ञान परीक्षा व निबंध स्पर्धा 2018*
----------------------------------------------------------------  
सर्व माननीय सभासदांस कळविण्यात हर्ष वाटतो कि बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं दर वर्षी होणाऱ्या मराठी भाषा, संस्कृती, ज्ञान परीक्षा व निबंध स्पर्धा ह्या वर्षी पासून "बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली आणि  राज्य मराठी विकास संस्था (महाराष्ट्र शासन),मुंबई" ह्यांच्या  संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणार आहेत. आवश्यक असलेल्या स्वीकृती व अनुमती घेण्यात थोडा विलंब झाल्या मुळे ह्या वर्षी हा उपक्रम  2 ऑक्टोबर रोजी आयोजित करता आला नाही. तरी वर्ष 2018 करीताच्या परीक्षा आणी स्पर्धा आता दिनांक 25 डिसेंबर 2018 (मंगळवार) रोजी सर्व  केंद्रांवर वर आयोजित करण्यात येतील. दोन्ही संस्थांच्या संयुक्त आयोजन समिती द्वारे विचारविमर्श अंती पुढच्या वर्षा पासून अर्थात 2019 पासून ह्या परीक्षा नवीन अभ्यासक्रमाच्या आधारावर घेण्याचा निर्णय ठरला आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.   ह्या सूचने सोबत आम्ही आवाहन करीत आहोत की बृहन्महाराष्ट्रात विविध नवीन केंद्र चालू करण्याचे प्रस्ताव आपण आम्हाला त्वरित पाठवावे व तसेच पूर्वी चालू असलेले केंद्र कांही  कारणाने बंद झाले असल्यास व आता ते पुन्हा सुरु करावयाचे  आहे त्यांनी देखील आपला लेखी प्रस्ताव आम्हाला dilipkumbhojkar@gmail.com  ह्या  ईमेल वर पाठवावा. ह्या संबंधीचे विस्तृत परिपत्र, निबंधाचे विषय इत्यादी साहित्य, मराठी भाषा परीक्षा प्रमुख ह्यांचा कडून संबंधितांस लवकरच प्राप्त होईल .    धन्यवाद दिलीप कुंभोजकर  प्रधान कार्यवाह