रतलाम (मध्यप्रदेश) येथे संस्था संवाद कार्यक्रम संपन्न

दिनांक २१ सप्टेंबर रोजी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे कार्याध्यक्ष श्री मिलिंद महाजन आणी कार्यवाह श्री दीपक कर्पे यांनी महाराष्ट्र समाज रतलाम येथे गणेशोत्सव चा योग साधून समाजाच्या विविध संस्था प्रतिनिधीं सोबत संवाद साधला. विविध संस्था पदाधिकाऱ्यांनी ह्या प्रसंगी बृहन्महाराष्ट्र मंडळा कडून असलेल्या अपेक्षा सांगितल्या तसंच श्री मिलिंदजी यांनी त्यावर शक्य असलेली सर्व मदत करण्या संबंधीचे मार्ग सुचविले. ह्या वेळेस रतलाम महापौर डाॅ सुनीता ताई यार्दे आवर्जून उपस्थित होत्या . महाराष्ट्र समाज रतलाम चे अध्यक्ष श्री सुधीर सराफ यांनी आणि अन्य मान्यवरांनी अतिथी स्वागत केले .