सेंधवा येथे संस्था संवाद संपन्न

आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे कार्याध्यक्ष श्री मिलिंद महाजन, कार्यवाह श्री दीपक कर्पे व संस्था समन्वयक श्री चंद्रशेखर आप्टे यांनी महाराष्ट्र ब्राह्मण समाज सेंधवा येथे मराठी भाषी समाजाच्या विविध संस्था प्रतिनिधीं सोबत संवाद साधला. सेंधवा येथे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे व्यक्तिगत किंवा संस्थागत सदस्य नाहीत म्हणून मुद्दाम हा कार्यक्रम आखला गेला होता. कार्याध्यक्षांशी भेटायला स्थानिक मराठी भाषी पाटिल समाज, चौधरी समाज, भोई समाज, माळी समाज, शिम्पी समाज, सोनी समाज, नाथ समाज आणि मराठी समाज चे पदाधिकारी आवर्जून आले होते. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मदतीनं विविध संस्थांची उन्नति कशी होउ शकते यावर सुसंवाद घडून आला. प्रसंगी महाराष्ट्र ब्राह्मण समाज सेंधवा नी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे संस्थागत सभासदत्व पत्करले, तसंच 5-6 संस्थांनी तर जवळ जवळ 25 लोकांनी लवकरच रीतसर सभासदत्व घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
ह्या भेटी दरम्यान सेंधवा येथील राज्य स्तरीय पदक विजेता मुलींने कत्थक नृत्य प्रस्तुत केले. सेंधवा येथील समाजातील बाल गोपालांनी कार्याध्यक्षांची विशेष भेट घेतली. ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आखणी सेंधवा येथील नगर पालिका परिषद मध्ये नुकत्याच निर्विरोध निर्वाचित झालेल्या नगरसेविका सौ. मेधा श्याम एकडी यांचे होते. अध्यक्ष श्री उपासनी यांच्या नेतृत्वात अतिथि स्वागत केले गेले. सभेत कार्यवाह श्री दीपक कर्पे यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या उपक्रमांचा परिचय दिला, तत्पश्चात श्री मिलिंद महाजन यांनी सभेस प्रेरक असे उद्बोधन दिले. कार्यक्रमाची सांगता श्री महागणपति च्या महाप्रसाद सहभोजनानी झाला.