बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंद महाजन यांच्या नेतृत्वात मंडळाच्या शिष्टमंडळाची आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट

आज दिनांक 14 डिसेंबर रोजी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंद महाजन यांच्या नेतृत्वात मंडळाच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन आगामी फेब्रुवारीत नियोजित अधिवेशनाकरिता त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. श्री फडणवीस यांनी मंडळाच्या वाटचालीची आपुलकी ने चौकशी केली आणी आपले समाधान व्यक्त केले . या प्रसंगी महाराष्ट्र भाजपचे वरिष्ठ नेते श्री प्रवीण दरेकर पण उपस्थित होते. अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून येण्यास श्री देवेन्द्र जी यांनी सहर्ष स्वीकृती दिली आहे. याप्रसंगी मंडळाच्या वतीने श्री अश्विन खरे, श्री यशोवर्धन फाटक, श्री अतुल्य बनवडीकर तसंच यजमान संस्थेच्या वतीने श्री प्रशांत बडवे आणि श्री सुनील धर्माधिकारी हे पण उपस्थित होते.